पैठण, (प्रतिनिधी): भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने पैठण शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले देशभक्तीचा संदेश देण्यासाठी आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक विविध शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात तिरंगा ध्वज असल्याने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे स्मरण करून नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता, शाकाहारी, वन, वहा, नाष्टा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
या तिरंगा रॅलीमुळे पैठण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. हुतात्मा स्मारक येथून निघालेली रॅली छत्रपती संभाजी चौक, बसस्थानक चौक, मार्गे छत्रपती संभाजी चौक येथे नेण्यात आली.
या रॅलीत माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, दत्ता गोर्डे किशोर चव्हाण, क्ष्मण औटे, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, नगरसेवक ज्ञानेश्वर दहिवाळ, बंडू आंधळे, सतीश आहेर, विजय चाटूफळे, सुरेश गायकवाड, सुरेश मानधने, अश्विनी लखमले, विशाल पोहेकर, गणेश डुकरे, कृष्णा लोळगे, वैभव पोहेकर, सतीश बोबडे, अनिल सुराशे, आदी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.













